मनस्वी मैत्रीण
निगर्वी,निःस्वार्थी मैत्री होणे आजच्या काळात किती कठीण असू शकते हे social media वर होणाऱ्या कचकड्याच्या आणि बेगडी मैत्रीच्या कहाण्या ऐकले की कळते. एकमेकांबद्दल असणारा आदर,आपुलकी,नात्यातील मोकळीक ह्या गुणांच्या पायावर मैत्री असेल तर ती शाश्वत असते.मैत्री सारख्या स्नेहार्द नात्यात खूप शब्द असणे गरजेचे नसते ना कुठला दिखाऊपणा दाखवून स्वतःला सिद्ध करावे लागते.कोणत्याही विपरीत परिस्थितीत 'मी आहे ना' हा विश्वास देणे गरजेचे असते आणि तो विश्वास ओढूनताणून येत नाही तो अगदी श्वासाइतका सहज आणि आपुलकीने जपला जातो.ज्या नात्यात इतकी आपुलकी आणि सहजता असते ते नाते उत्तमरीत्या रुजते आणि फुलते. अश्या मैत्रीत एकमेकांना समजावून घेतले जाते,काही गैरसमज झाले तरी होणाऱ्या रुसव्या फुगव्या मध्ये समजूत काढताना मजा येते आणि बंध अजून दृढ होतात.काही चुकीचे वाटले तर मान खाली न जाता उलट व्यक्त होता आले म्हणून दडपण घालवणारी ही मैत्री. अश्या मैत्रीत जबाबदारी सुद्धा येते ती एकमेकांना साथ देण्याची.सुखात वा दुःखात, आनंदात अथवा विरहात,मैफिलीत अथवा विरहात ही साथ महत्वाची असते. अश्या मैत्रीला सामान्यता वेगळ्या नजरे...