मनस्वी मैत्रीण

 निगर्वी,निःस्वार्थी मैत्री होणे आजच्या काळात किती कठीण असू शकते हे social media वर होणाऱ्या कचकड्याच्या आणि बेगडी मैत्रीच्या कहाण्या ऐकले की कळते.

एकमेकांबद्दल असणारा आदर,आपुलकी,नात्यातील मोकळीक ह्या गुणांच्या पायावर मैत्री असेल तर ती शाश्वत असते.मैत्री सारख्या स्नेहार्द नात्यात खूप शब्द असणे गरजेचे नसते ना कुठला दिखाऊपणा दाखवून स्वतःला सिद्ध करावे लागते.कोणत्याही विपरीत परिस्थितीत 'मी आहे ना' हा विश्वास देणे गरजेचे असते आणि तो विश्वास ओढूनताणून येत नाही तो अगदी श्वासाइतका सहज आणि आपुलकीने जपला जातो.ज्या नात्यात इतकी आपुलकी आणि सहजता असते ते नाते उत्तमरीत्या रुजते आणि फुलते.

अश्या मैत्रीत एकमेकांना समजावून घेतले जाते,काही गैरसमज झाले तरी होणाऱ्या रुसव्या फुगव्या मध्ये समजूत काढताना मजा येते आणि बंध अजून दृढ होतात.काही चुकीचे वाटले तर मान खाली न जाता उलट व्यक्त होता आले म्हणून दडपण घालवणारी ही मैत्री.

अश्या मैत्रीत जबाबदारी सुद्धा येते ती एकमेकांना साथ देण्याची.सुखात वा दुःखात, आनंदात अथवा विरहात,मैफिलीत अथवा विरहात ही साथ महत्वाची असते.

अश्या मैत्रीला  सामान्यता वेगळ्या नजरेने जोखले जाते,कुजबुजतात लोक विशेषतः दोघेही विवाहीत असतील तर.त्या पलीकडेही मैत्रीचे नाते असू शकते हे लोकांना समजू शकत नाही.त्यांची मानसिकता आपण बदलू शकत नाही.

आजच ग्रुप वर एक पोस्ट वाचण्यात आली की पुरुष स्त्री च्या रंग आणि रुपा  पेक्षा बुध्दिकडे जास्त आकर्षित होतात,बुद्धिमान स्त्री ची संगत त्यांना समृद्ध करते.,मी सुद्धा तुझ्यात असलेल्या बौद्धिक प्रगल्भतेचा,मनस्वीपणाचा चाहता आहे.तुझी मते अभ्यासपूर्ण आणि logically परफेक्ट असतात.तुझ्या कृती सौन्दर्यपूर्वक असतात ,टापटीपपणा असतो तुझ्या वावरण्यात आणि घर सजविण्यात.तुला पाककलेची आवड आतून आहे आणि पदार्थ झाल्यावर जी सजावट करते ती अतिशय देखणी असते अजून किती कित्ती सांगण्यासारखे आहे तुझ्याबद्दल.

काल रात्री विचार करत होतो तुझ्या शिवाय हे जग असेल अशी कल्पना सुद्धा करता येत नाही,एवढी आपुलकी ओढ एखाद्याबाद्दल का वाटते याची उत्तरे शोधण्याचा प्रयत्नच मी आताशा करीत नाही.शेवटी आपल्याला जाताना काय बरोबर घेऊन जायचे आहे? हीच नाती कॅरी करावी आणि नात्यांचे पावित्र्य जपणे आपल्या हातात आहे.

   तर साना असे आहे बुवा आपले😀😀.मज्जा आहे ना.तू कसे पाहते ग आपल्या मैत्रीकडे.मला तर इंद्रधनुष्यासारखे वाटते आपले नाते रोज नवे रंग आणि ते एकमेकांत गुंफून होणारे इंद्रधनुष्य जे पेलायची ताकद  आपल्याला ईश्वर देवो. Emotionally yours. विनय.

Comments